जिल्हा परिषदांच्या १८ हजार शाळा बंद होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदांच्या १८ हजार शाळा बंद होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांबाबत एक महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, राज्यातील १८ हजार जिल्हा परिषद शाळा लवकरच बंद करण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत २०२५-२६ हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या केवळ २० पेक्षा कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने अशा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

एकूण महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदांच्या सुमारे १ लाख ८ हजार शाळा आहेत. यातील १८ हजार शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी शिकत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शाळा विलीनीकरणाच्या प्रक्रियेतून बंद केल्या जातील, अशी माहिती पावसाळी अधिवेशनात देण्यात आली.

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा आणि संसाधनांचा योग्य वापर होण्यास अडचणी येतात. त्यामुळे ही शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या इतर शाळांमध्ये करण्यात येणार आहे.

Leave a Comment