८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी? कारण जाणून घ्या
८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या आंदोलनामुळे सुट्टी असणार आहे. ही नियमित किंवा सरकारी सुट्टी नाही, तर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
शिक्षकांचा संप आणि पाठिंबा
शिक्षकांच्या जुना प्रश्नांबाबत सरकारने योग्य तो निर्णय घेतलेला नाही, म्हणूनच दोन दिवसांचा संप करण्यात आला आहे. या संपाला संयुक्त मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ आणि इतर अनेक शिक्षक संघटनांनी ठाम पाठिंबा दिला आहे.
मुख्य मागण्या काय आहेत?
या आंदोलनात शिक्षकांची प्रमुख मागणी म्हणजे अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या अनुदान टप्प्यात वाढ करणे. यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आधीच निघाला असला तरी सरकारकडून अंमलबजावणी केली जात नसल्याने शिक्षक आंदोलन करीत आहेत.
कोणत्या शाळांना सुट्टी राहणार?
हा संप मुख्यतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पुकारला आहे. त्यामुळे या शाळांमध्ये सुट्टी राहील. तसेच, या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या शिक्षक संघटनांशी संलग्न असलेल्या इतर शाळांनाही सुट्टी असण्याची शक्यता आहे.