पोस्ट ऑफिसची खास योजना : पोस्ट ऑफिस मधून दर महिन्याला मिळतील ₹20,000 हे काम पटकन करा!
आजकाल प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी बचत करून ती सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवण्याचा विचार करतो. अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम्स (Post Office Small Saving Schemes) खूप लोकप्रिय आहेत. या योजना फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याज देतात आणि यामध्ये सरकारच तुमच्या गुंतवणुकीची खात्री देते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना – Senior Citizen Saving Scheme
ही योजना खास निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवली आहे. या योजनेत एकदाच गुंतवणूक करून दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवता येतं. जर तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक केली, तर घरी बसून दर महिन्याला ₹20,000 पेक्षा जास्त मिळू शकतात.
योजनेचे फायदे
- 8.2% व्याजदर – फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा अधिक
- कर सवलत – कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत कर सूट
- निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य
- बँकेत पेक्षा सुरक्षित आणि खात्रीशीर स्कीम
कोण अर्ज करू शकतो?
- 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले नागरिक
- सरकारी नोकरीतून VRS घेतलेले 55 ते 60 वयोगटातील व्यक्ती
- संरक्षण क्षेत्रातील (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) कर्मचारी, वय 50 ते 60 वर्षे
गुंतवणुकीची मर्यादा
- किमान गुंतवणूक: ₹1000
- कमाल गुंतवणूक: ₹30 लाख
- मॅच्युरिटी कालावधी: 5 वर्षे (आवश्यकतेनुसार वाढवता येते)
कसं मिळेल दरमहा ₹20,000 उत्पन्न?
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत एकदाच ₹30 लाख गुंतवले, तर त्याला वर्षभरात सुमारे ₹2.46 लाख व्याज मिळेल (8.2% दराने). म्हणजेच, दर महिन्याला सुमारे ₹20,500 ची खात्रीशीर कमाई होईल.
अकाउंट कधीही बंद करता येतो
या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यावर काही कारणास्तव अकाउंट बंद करावं लागल्यास, त्याचीही सुविधा आहे:
- 1 वर्षाआधी बंद केल्यास व्याज मिळणार नाही
- 1-2 वर्षांमध्ये बंद केल्यास 1.5% व्याज कपात
- 2-5 वर्षांदरम्यान बंद केल्यास 1% व्याज कपात
टीडीएस (TDS) आणि फॉर्म 15G/15H
जर वार्षिक व्याज ₹50,000 पेक्षा जास्त असेल, तर टीडीएस लागतो. मात्र जर तुम्ही फॉर्म 15G किंवा 15H भरला असेल, तर टीडीएस कापला जात नाही.
पोस्ट ऑफिसची ही स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. यात एकदाच गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला निश्चित रक्कम मिळते. त्यामुळे निवृत्तीनंतरचा काळ आर्थिक दृष्ट्या स्वतंत्रपणे आणि निर्धास्तपणे घालवता येतो.