पोस्ट ऑफिस योजना : फक्त व्याजातून मिळतील ₹८२,०००; नफा! फक्त हे काम करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोस्ट ऑफिस योजना : फक्त व्याजातून मिळतील ₹८२,०००; नफा! फक्त हे काम करा

आपल्याला कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचं असल्यास चांगल्या रकमेची आवश्यकता असते. मग ते घर खरेदी करणं असो, गाडी घेणं असो किंवा भविष्यासाठी मोठी बचत करणं असो, केवळ पगाराच्या आधारे ही उद्दिष्टं गाठणं कठीण असतं.

यासाठी अनेक लोक म्युच्युअल फंडातील SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) चा पर्याय निवडतात. परंतु, काही लोक रिस्क न घेता सुरक्षित आणि स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजना निवडतात. यासाठी पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत चालणाऱ्या काही योजना अत्यंत उपयुक्त ठरतात.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बचत योजना

आज आपण अशाच एका लोकप्रिय योजनेंबद्दल जाणून घेणार आहोत – ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). ही योजना भारत सरकारने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा फायदा तुम्ही तुमच्या वडिलांना, आईला किंवा आजी-आजोबांना घेऊन देऊ शकता.

SCSS योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाची किमान अट ६० वर्षे आहे. या योजनेत किमान गुंतवणूक रक्कम ₹१००० असून, कमाल मर्यादा ₹३० लाख इतकी आहे. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, मात्र हवं असल्यास तो ३ वर्षांनी वाढवता येतो.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्याजदर आणि कर सवलती

SCSS अंतर्गत सध्या ८.२% वार्षिक व्याजदर दिला जातो. हा व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केला जातो, परंतु पैसे वार्षिक स्वरूपात मिळतात. याशिवाय, आयकर कलम ८०सी अंतर्गत ₹१.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीसाठी पात्र ठरते.

कशी होईल ₹८२,००० ची कमाई?

जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत ₹२,००,००० ची एकरकमी गुंतवणूक केली, तर ५ वर्षांच्या कालावधीत फक्त व्याजातूनच ₹८२,००० ची कमाई होऊ शकते. यामध्ये प्रत्येक तिमाहीला सुमारे ₹४,०९९ इतकं व्याज मिळेल. ५ वर्षांनी एकूण मिळणारी रक्कम ₹२,८२,००० इतकी होईल.

Leave a Comment