PM Kisan Yojana: 20वा हप्ता ₹2000 जमा होणार! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा!
शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 18 जुलै 2025 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मागील हप्ता कधी आला होता?
19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 20व्या हप्त्यावर लागले आहे.
यादीत नाव नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर काय कराल?
1. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा:
योजना सुरू ठेवण्यासाठी e-KYC करणं गरजेचं आहे. हे तुम्ही ऑनलाइन OTP किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिकद्वारे करू शकता.
2. नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा:
यादीत नाव नसल्यास तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यासाठी लगेच कृषी विभागाशी संपर्क साधा.
3. कागदपत्र तपासा:
जर बँक खाते, IFSC कोड किंवा आधार क्रमांकात काही चूक असेल, तर तातडीने दुरुस्त करा.
तुमचं नाव यादीत आहे का हे पाहण्यासाठी
- pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
- ‘किसान कॉर्नर’ मध्ये ‘Beneficiary List’ वर क्लिक करा
- राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
- ‘Get Report’ वर क्लिक केल्यावर यादी दिसेल
नोंदणी स्टेटस पाहण्यासाठी
- pmkisan.gov.in वर जा
- ‘Status of Self Registered Farmer’ वर क्लिक करा
- आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका
- सबमिट केल्यावर नोंदणीची माहिती दिसेल
योजना संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे
🔸 वार्षिक लाभ – पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ₹6,000 मिळतात (₹2,000 चे तीन हप्ते)
🔸 हप्ता जमा होण्याची शक्यता – 18 जुलै 2025
🔸 ई-केवायसी आवश्यक – ऑनलाइन किंवा CSC केंद्रात करता येते
🔸 शेतकरी ओळखपत्र – शेतकऱ्यांच्या नावाने जमीन, आधार, मोबाईल यांची माहिती असलेलं कार्ड अद्ययावत असणं गरजेचं
शेतकऱ्यांसाठी इतर सुविधा
- किसान क्रेडिट कार्ड (KCC): कमी व्याज दरात कर्ज मिळवता येते
- किसान ई-मित्र चॅटबॉट: 10 भाषांमध्ये मार्गदर्शन मिळवता येतं
- हेल्पलाईन क्रमांक:
☎️ 155261 किंवा 011-24300606
🌐 pmkisan.gov.in
लक्षात ठेवा
- तुमचं बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे
- जमिनीची कागदपत्रे योग्य आणि पूर्ण हवीत
- मोबाईल नंबरही नोंदणीकृत असावा
टीप: ही माहिती विविध अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहे. कोणतीही प्रक्रिया करण्याआधी सरकारी संकेतस्थळावर खात्री करून घ्या.