PM Kisan 20th installment 2025 : पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट खात्यात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 20th installment 2025 : पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर – 2000 रुपये थेट खात्यात

PM Kisan Yojana 20वी हप्ता जून 2025

जर तुम्ही eKYC, बँक डिटेल्स अपडेट करणं आणि नोंदणी यासारखी आवश्यक कामं पूर्ण केलेली नसतील, तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ही कामं पूर्ण करा, जेणेकरून सरकारकडून पैसे ट्रान्सफर होताच ते तुमच्या खात्यात अडथळ्याशिवाय जमा होतील.

२०वी हप्त्याची प्रतिक्षा सुरू

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) आता २०वा हप्ता मिळण्याची वेळ आली आहे आणि देशातील लाखो शेतकरी तो कधी खात्यात येईल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 जमा होण्याची शक्यता आहे. परंतु अनेकांच्या मनात प्रश्न आहे – हप्ता या आठवड्यात येणार का? चला जाणून घेऊया योजनेशी संबंधित महत्त्वाची माहिती.

शेतकऱ्यांना वर्षाला मिळतात ₹6000

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना एकूण ₹6000 तीन समान हप्त्यांमध्ये देते – म्हणजे दर 4 महिन्यांनी ₹2000. मागील म्हणजे १९वा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला गेला होता.

२०वा हप्ता कधी येईल?

माध्यमांच्या रिपोर्टनुसार आणि मागील हप्त्यांच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास, २०वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारकडून अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे अत्यंत गरजेचे

ज्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता थांबवण्यात येऊ शकतो. केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की eKYC पूर्ण केल्याशिवाय कोणतीही रक्कम दिली जाणार नाही. त्यामुळे जर हे काम बाकी असेल, तर लवकरात लवकर पूर्ण करा.

आपले नाव लाभार्थी यादीत आहे का? ते तपासा

काही वेळा शेतकऱ्यांचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जातं किंवा कागदपत्रांची पूर्तता होत नाही, यामुळे हप्ता मिळत नाही. तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ मध्ये तुमचं नाव तपासू शकता. जर नाव असेल, तर तुमचा हप्ता खात्यात येईलच.

बँक खात्याची माहिती योग्य आहे का, ते तपासा

पैसे अडकण्यामागे अनेकदा चुकीची बँक डिटेल्स हे कारण असते – उदा. IFSC कोड चुकीचा असणे, खाते बंद असणे किंवा आधारशी लिंक नसणे. त्यामुळे एकदा खात्री करा की तुमचं बँक डिटेल्स योग्य आहेत.

PM किसान योजनेचा २०वा हप्ता जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी eKYC, बँक डिटेल्स व नाव यादीत आहे की नाही, हे योग्यरित्या तपासणं गरजेचं आहे.

Leave a Comment