माझी लाडकी बहीण योजना : आनंदाची बातमी! आजपासून खात्यात ₹ १५०० जमा होणार; अजित पवारांची घोषणा
महिलांसाठी खुशखबर! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जून महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली.
लाडकी बहिणींसाठी १२वा हप्ता
‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जून महिन्याचा १२वा हप्ता ३० जूनपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना मे महिन्याचा हप्ता केवायसी किंवा इतर कारणांमुळे मिळाला नव्हता, अशा महिलांना मे आणि जूनचा एकत्रित हप्ता म्हणजेच ₹3000 जमा होणार आहे.
योजनेला एक वर्ष पूर्ण
ही योजना जुलै 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली होती. आता योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुभेच्छा देत ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच महिलांसाठी एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.
हप्ता मिळाला का? असा करा स्टेटस तपास
- नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा
गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अॅप डाऊनलोड करा. - मोबाईल नंबरने लॉगिन करा
अॅप उघडा, मोबाईल नंबर टाका आणि ओटीपीने लॉगिन करा. - मंजूर यादी तपासा
अॅपमध्ये “लाडकी बहीण योजना” निवडा. अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून आपले नाव यादीत आहे का ते पाहा. - अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा
ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जदार लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात आपले नाव तपासा. - ऑफलाइन माहिती
ऑनलाइन तपासणी शक्य नसेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सेतू केंद्रात जाऊन माहिती मिळवा.
हप्ता जमा झाल्याबाबतची यादी दररोज अद्ययावत केली जाते, त्यामुळे नियमितपणे तपासणी करत राहा.