महाराष्ट्र शासन : कोतवाल (महसूल सेवक) पदांसाठी मोठी भरती सुरु ! जाहिरात प्रसिद्ध.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासन : कोतवाल (महसूल सेवक) पदांसाठी मोठी भरती सुरु ! जाहिरात प्रसिद्ध.

जिल्हा निवड समिती, अहिल्यनगर यांच्या मार्फत महसूल सेवक (कोतवाल) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 158 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 18 जुलै 2025 पूर्वी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित तहसील कार्यालयात सादर करावा.

🔹 अहिल्यनगर कोतवाल भरती 2025 – संक्षिप्त माहिती

  • भरतीचे नाव: जिल्हा निवड समिती, अहिल्यनगर
  • पदाचे नाव: महसूल सेवक – कोतवाल
  • एकूण पदे: 158
  • नोकरीचे ठिकाण: अहिल्यनगर जिल्हा, महाराष्ट्र
  • पगार: प्रतिमहा ₹15,000/-
  • वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे (30 जुलै 2023 रोजी अनुशंगाने)
  • शैक्षणिक पात्रता: किमान 4 थी उत्तीर्ण
  • निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा व गुणवत्ता यादी
  • अर्जाची शेवटची तारीख: 18 जुलै 2025
  • अर्जाचा प्रकार: ऑफलाईन

🔹 पदांचा तपशील तालुकानुसार

तालुकाजाहिरातपदसंख्या
पाथर्डीयेथे क्लिक करा 13
संगमनेरयेथे क्लिक करा 16
श्रीरामपूरयेथे क्लिक करा08
शेवगावयेथे क्लिक करा07
श्रीगोंदा-पारनेरयेथे क्लिक करा20
राहातायेथे क्लिक करा07
राहुरीयेथे क्लिक करा12
पारनेरयेथे क्लिक करा21
जामखेडयेथे क्लिक करा06
नेवासायेथे क्लिक करा10
कोपरगावयेथे क्लिक करा10
अहिल्यनगरयेथे क्लिक करा14
कर्जतयेथे क्लिक करा14

🔹 पात्रता व अटी

  • उमेदवार हा अहिल्यनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
  • किमान चौथी पास असणे आवश्यक.
  • शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
  • पदे तात्पुरत्या स्वरूपाची असतील.

🔹 अर्ज कसा करायचा?

  1. जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरावा.
  2. सर्व आवश्यक कागदपत्रांसह (शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास, आधार इ.) अर्ज तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रत्यक्ष सादर करावा.
  3. अर्जाचा नमुना जाहिरातीसह देण्यात आला आहे.

अर्ज पाठवायचा पत्ता:
मा. तहसीलदार व सदस्य, निवड समिती, अहिल्यनगर

🔹 आवश्यक कागदपत्रे

  • 4 थी पास मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाइड
  • जात प्रमाणपत्र / जात वैधता
  • आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / गावसेवक / तलाठ्यांनी दिलेला रहिवासी पुरावा
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

🔹 लेखी परीक्षेबाबत माहिती

  • परीक्षेत एकूण 50 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा.
  • एकूण गुण – 100
  • विषय: मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थानिक जिल्हा माहिती
  • उत्तरपत्रिकेचे परीक्षण OMR प्रणालीद्वारे होईल.

🔹 महत्त्वाच्या लिंक

  • जाहिरात PDF – (तालुकानुसार उपलब्ध)
  • अर्ज नमुना – जाहिरातीत संलग्न

🗓️ शेवटची तारीख – 18 जुलै 2025

⏳ अर्ज सादर करण्यास उशीर करू नका. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

Leave a Comment