1446 जागांसाठी नोकरीची संधी | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण / 10वी उत्तीर्ण | वेतन : 15000-25000

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1446 जागांसाठी नोकरीची संधी | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण / 10वी उत्तीर्ण | वेतन : 15000-25000

IGI एविएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्लीमार्फत विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १४४६ रिक्त पदांची भरती होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे, त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

या भरतीत दोन प्रकारची पदं आहेत – एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर (फक्त पुरुषांसाठी). ग्राउंड स्टाफसाठी एकूण १०१७ जागा, तर लोडरसाठी ४२६ जागा राखीव आहेत. शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचं झाल्यास, ग्राउंड स्टाफ पदासाठी १२वी पास किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे. तर लोडर पदासाठी १०वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादेबाबत सांगायचं झाल्यास, ग्राउंड स्टाफसाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे, तर लोडर पदासाठी किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करताना परीक्षा फी भरावी लागेल. ग्राउंड स्टाफ पदासाठी ३५० रुपये, तर लोडर पदासाठी २५० रुपये परीक्षा शुल्क आहे.

पगाराची बाब विचारात घेतली तर, निवड झालेल्या ग्राउंड स्टाफ उमेदवारांना दरमहा ₹२५,००० ते ₹३५,००० पगार दिला जाईल. तर लोडर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹१५,००० ते ₹२५,००० दरमहा पगार मिळणार आहे.

निवड प्रक्रिया पूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल. ही परीक्षा १०वीच्या अभ्यासक्रमाच्या पातळीवर घेतली जाणार असून यात सामान्य जागरूकता, तर्कशक्ती, इंग्रजी आणि विमान वाहतूक या विषयांवर आधारित १०० बहुपर्यायी प्रश्न असतील, जे एकूण १०० गुणांचे असतील. विशेष बाब म्हणजे या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही.

Leave a Comment