सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्टयांची यादी जाहीर ; परिपत्रक निर्गमित दि.27.06.2025 | School Holiday List 2025
शाळेच्या सुट्ट्यांची यादी – शैक्षणिक वर्ष 2025-26
परिपत्रक दिनांक: 27 जून 2025
लागू कालावधी: 15 जून 2025 ते 14 जून 2026
एकूण सुट्ट्यांचा तपशील:
- विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या – 3 दिवस
- मुख्याध्यापकांच्या अधिकारातील स्थानिक सुट्ट्या – 3 दिवस
- सार्वजनिक व पर्यायी सुट्ट्या (राज्य शासनाच्या सुट्ट्या) – 20 दिवस
- दिवाळी सुट्टी – 17 ऑक्टोबर 2025 ते 1 नोव्हेंबर 2025 (13 दिवस)
- उन्हाळी सुट्टी – 2 मे 2026 ते 13 जून 2026 (37 दिवस)
एकूण सुट्टीचे दिवस: 76 दिवस
शालेय सत्र कालावधी:
- पहिलं सत्र: 16 जून 2025 ते 16 ऑक्टोबर 2025
- दुसरं सत्र: 3 नोव्हेंबर 2025 ते 1 मे 2026
पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात: 15 जून 2026 (सोमवार)
परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या सूचना
- शाळांनी शासनाने जाहीर केलेल्या सुट्ट्या बांधीलपणे पाळाव्यात. त्यामध्ये बदल करता येणार नाही.
- जर शाळेला एखाद्या सणासाठी अतिरिक्त सुट्टी द्यायची असेल, तर ती उन्हाळी किंवा दिवाळी सुट्टीतून समायोजित करावी लागेल आणि पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
- शाळेने एकूण 76 पेक्षा अधिक सुट्टी घेऊ नये. एकूण किमान 230 कार्यदिवस असणे आवश्यक आहे.
- प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर वगळता इतर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उन्हाळी व दिवाळी सुट्ट्या लागू होत नाहीत.
- मुख्याध्यापकांनी स्थानिक सुट्ट्यांची यादी वर्षाच्या सुरुवातीलाच तयार करून शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवावी.
- थोर व्यक्तींच्या जयंती/पुण्यतिथीच्या दिवशी सुट्टी असल्यास ती शाळेतच साजरी करावी.
- आश्रमशाळांमध्ये सुट्ट्या स्थानिक गरजांनुसार थोड्या वेगळ्या असू शकतात.
- यादीत जर कोणतीही त्रुटी असेल, तर शासनाने अधिकृतपणे जाहीर केलेल्या तारखांना सुट्टी द्यावी.
- आपत्कालीन परिस्थितीत किंवा शासनाच्या नव्या सूचनेनुसार शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतात.

स्रोत
- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन
- विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक
- शिक्षण संचालक, पुणे
शाळांनी ह्या यादीनुसारच कामकाज करावे. कोणत्याही परिस्थितीत अधिक सुट्ट्या घेणे टाळावे.